Breaking : निलेश आणि नारायण राणेंकडून पाहणी, त्याचवेळी आदित्य ठाकरे पोहोचले; राजकोट किल्ल्याजवळ मोठा राडा

Aug 28, 2024 - 12:37
 0
Breaking : निलेश आणि नारायण राणेंकडून पाहणी, त्याचवेळी आदित्य ठाकरे पोहोचले; राजकोट किल्ल्याजवळ मोठा राडा

सिंधुदुर्ग : मालवण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अपघात प्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे पाहणीसाठी आले. त्यावेळी आदित्य ठाकरे दाखल होताच प्रवेशद्वारावरच राडा झाल्याचे पाहायला मिळाला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी लगेच कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी आदित्य ठाकरेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचं आयोजन केलंय. विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, विनायक राऊत हे मोर्चात सहभागी होतील. आज मालवणमध्ये भरड नाका ते मालवण तहसीलदार कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली. तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्यावतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, 24 वर्षाच्या मुलाला कंत्राट कोणी दिले? ते फरार आहे त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत त्यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे का? हे अत्यंत दुर्दैवी आहे.मी येत असताना राडा झाला. पत्रकाराला धक्काबुक्की झाली. मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की, महाराजांच्या किल्ल्यांमध्ये आपल्याला राजकारण करायचे नाही म्हणून मी कार्यकर्त्यांना देखील अडवले आहे. या बालीशपणात मला पडायचे नाही. पंतप्रधानांना खुश करायचे. त्यांना निवडणुकीच्या आधी डिसेंबरमध्ये बोलवण्यात आले.

भ्रष्टाचारी सरकारने महाराजांना देखील सोडले नाही : आदित्य ठाकरे

पुतळ्याची सर्व जबाबादारी झटकली आणि नौदलावर त्याचे खापर फोडण्यात आले. महाराष्ट्रात ज्या काही घटना होत आहे. भ्रष्टाचारी खोके सरकार यांचा भ्रष्टाचार वरपासून खालपर्यत आहे. आता यांच्या भ्रष्टाचाराने महाराजांना देखील सोडले नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 28-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow