खेडमध्ये गोविंद पथकांनी फोडल्या ४५० हून अधिक हंड्या

Aug 29, 2024 - 11:07
 0
खेडमध्ये गोविंद पथकांनी फोडल्या ४५० हून अधिक हंड्या

खेड : शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी ४५० हून अधिक दहीहंड्या फुटल्या. यामध्ये १२ सार्वजनिक दहीहंडघांचा समावेश आहे. १५ हुन अधिक गोविंदा पथकांमार्फत ठिकठिकाणच्या दहीहंड्यांना सलामी देऊन हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या गर्दीमधून वाहतूक नियमन करण्यासाठी पोलिसांनी विशेष तयारी केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी न होता सण उत्साहात साजरा झाला.

शहरात मनसे, शिवसेना, उबाठा, भाजपकडून लाखो रुपयांची बक्षिसे दहीहंड्या फोडण्यासाठी येणाऱ्या गोविंदा पथकांसाठी जाहीर केली होती. शहरातील हनुमान पेठ, शिवतर रोड, एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, महाड नाका, वाणी पेठ, निवाचा चौक, गांधी चौक, तीनवती नाका, खांवतळे आदी परिसरात दहीहंड्या त्रांधण्यात आल्या होत्या. शिवसेना व मनसेच्या दहीहंडी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

हिंदुराज मित्रमंडळ गोविंदा पथक, हिंदुराज महिला मित्रमंडळ, श्रीकृष्ण गोविंदा पथक कुवारसाई, बाळ गोपाळ गोविंदा पथक-संत रोहिदासनगर, जय हनुमान मित्रमंडळ-रेवेचीवाडी, संत गोरा कुंभार मित्रमंडळ, श्री काळकाई गोविंदा पथक भरणे, हनुमान मित्रमंडळ खेड, एकवीरा कुंभारवाडा गोविंदा पथक, श्री महालक्ष्मी गोविंदा पथक चाकाळे, श्री खोंडेकरीणदेवी खोंडे, क्षेत्रपालनगर गोविंदा पथक, खेमनाथ गोविंदा पथक सुसेरी-खारी, भैरवनाथ गोविंदा पथक चिंचघर, श्रीकृष्ण गोविंदा पथक भडगाव आदी गोविंदा पथके शहर व भरणे परिसरातील हंड्या फोडण्यासाठी चुरस दिसून आली.

दहीहंड्याचा थरार सांयकाळी उशिरापर्यंत सुरू होता. गोपाळकालानिमित्त सर्वत्र दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा होत असताना वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून सायंकाळी ४ नंतर अवजड वाहनांना खेड शहरात प्रवेश देणे थांबवण्यात आले, तसेच दापोलीकडे जाण्यासाठी दापोलीकडून खेडमध्ये येण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 29/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow