महत्वाची बातमी : Passport Service - देशात 5 दिवस पासपोर्ट सेवा राहणार बंद

Aug 29, 2024 - 11:04
 0
महत्वाची बातमी : Passport Service - देशात 5 दिवस पासपोर्ट सेवा राहणार बंद

नवी दिल्ली : देशभरातील पासपोर्ट सेवा (Passport Service) 5 दिवसांसाठी बंद राहणार आहे. पासपोर्ट विभागाने एक ॲडव्हायजरी जारी करुन याबाबतची माहिती दिली आहे. तांत्रिक देखभालीमुळं (technical maintenance) पासपोर्ट सेवा पोर्टल आजपासून म्हणजे 29 ऑगस्ट रात्री 8 वाजल्यापासून ते 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत बंद राहणार असल्याचे विभागाने म्हटले आहे.

या कालावधीत पासपोर्ट केंद्रांवर कोणत्याही नवीन अपॉइंटमेंट्स शेड्यूल केल्या जाणार नाहीत. तसेच आधी बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स पुन्हा शेड्यूल केल्या जाणार आहेत.

दरम्यान, एखाद्याला जर नवीन पासपोर्ट काढायचा असेल तर आता तुम्हाला 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्याचवेळी, जर तुम्ही आधीच नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला त्यासाठी 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान तारीख मिळाली असेल, तर ती देखील रद्द केली जाईल आणि वाढवली जाईल. या पाच दिवसांमध्ये नागरिकांसाठी आणि सर्व MEA/RPO/BOI/ISP/DOP/पोलीस अधिकाऱ्यांसाठी ही प्रणाली उपलब्ध नसेल, असं पासपोर्ट विभागाने ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे.

पाच दिवस विभागात कोणतेही काम होणार नाही

पाच दिवस विभागाचे कोणतेही काम होणार नाही. सेवा बंद झाल्याचा परिणाम पासपोर्ट सेवा केंद्र तसेच स्थानिक पासपोर्ट कार्यालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात दिसून येईल.

भारतात पासपोर्टचे किती प्रकार?

भारतात तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. यामध्ये पहिला ब्लूकव्हर पासपोर्ट, दुसरा मरुन कव्हर पासपोर्ट आणि तिसरा ग्रेकव्हर पासपोर्ट आहे.

ब्लूकव्हर पासपोर्ट

ब्लूकव्हर पासपोर्ट हा एक सामान्य पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट कोणत्याही भारतीय नागरिकाला दिला जातो.

मरुन कव्हर पासपोर्ट

मरुन कव्हर पासपोर्ट हा डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट अधिकृत मुत्सद्दी आणि सरकारी पदे असलेल्या सदस्यांसाठी भारत सरकारद्वारे जारी केले जाते.

ग्रेकव्हर पासपोर्ट

ग्रेकव्हर पासपोर्ट हा अधिकृत पासपोर्ट आहे. हा पासपोर्ट परदेशात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अधिकृत असाइनमेंटवर सरकारने खास अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला दिला जातो.

देशभरातील अर्जदारांना अडचणींना सामोरे जावे लागणार

दरम्यान, आधीच्या अर्जानंतर 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत अपॉइंटमेंट मिळाल्यास ती दुसऱ्या तारखेला बदलावी लागणार आहे. अशा तऱ्हेने केवळ दिल्लीच नव्हे तर देशभरातील अर्जदारांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या कालावधीत लोकांना नवीन अर्ज करता येणार नाहीत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow