काँग्रेस युवक विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी इरफान होडेकर

Aug 5, 2024 - 11:57
Aug 5, 2024 - 15:58
 0
काँग्रेस युवक विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी इरफान होडेकर

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. पारंपरिक मतदार दुरावू नये यासाठी ही दक्षता घेतली जात आहे. काँग्रेसचे युवक विधानसभा क्षेत्राध्यक्ष म्हणून इरफान होडेकर आणि शहर अध्यक्षपदी फईम फणसोपकर यांची नियुक्ती करण्यात आली. 

काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसच्या राज्याच्या नेत्या सोनललक्ष्मी घाग यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली. याच कार्यक्रमावेळी तालुक्यातील अनेकांचा काँग्रेस प्रवेश झाला. यावेळी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष साजीद सरगुरोह, प्रदेश युवक नेत्या शिल्पा कांबळे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:26 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow