रत्नागिरी : महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणी लांबणीवर

Aug 29, 2024 - 15:56
 0
रत्नागिरी : महिला आयोग आपल्या दारी जनसुनावणी लांबणीवर

त्नागिरी : महाराष्ट्र राज्य महिला आयोगामार्फत गुरुवारी (२९ ऑगस्ट) रत्नागिरीत होणारी जनसुनावणी लांबणीवर गेली आहे.

आयोगाचे कार्यालय मुंबईत असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबईत पोहोचणे शक्य होत नाही.

महिलांना त्यांच्या तक्रारी, समस्यांबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाद्वारे रत्नागिरीत २९ ऑगस्ट रोजी जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. ही सुनावणी पुढे ढकलण्यात येत असल्याचे महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी कळविले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 29-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow