IMDb च्या यादीत स्त्री-2 चा डंका

Aug 29, 2024 - 14:45
Aug 29, 2024 - 15:49
 0
IMDb च्या यादीत स्त्री-2 चा डंका

बॉक्स ऑफिसवर श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव (Rajkumar Rao) यांच्या 'स्त्री-2'ने धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर स्त्री-2 चांगली कमाई करत असताना दुसरीकडे कलाकारांचाही डंका वाजत आहे.

चित्रपटातील कलाकार हे आयएमडीबी (IMDb) मधील भारतीय कलाकारांच्या यादीत आघाडीवर आहेत.

या आठवड्याच्या IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत, ‘स्त्री 2: सरकटे का आतंक’चे कलाकार आघाडीच्या स्थानावर आले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. नायक राजकुमार राव 12 व्या तर अभिषेक बॅनर्जी 19 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्यासोबत सातव्या क्रमांकावर अक्षय कुमार, 13 व्या क्रमांकावर तमन्ना भाटिया आणि 20 व्या क्रमांकावर अन्या सिंग आहे. या सर्वांनी चित्रपटात विशेष भूमिका साकारल्या आहेत.

'कल्की 2898 AD' चे कलाकार चित्रपटाच्या OTT रिलीजनंतर पुन्हा या यादीत आघाडीवर आले आहेत. मृणाल ठाकूर, दीपिका पदुकोण, प्रभास, दिशा पटानी, अमिताभ बच्चन, कमल हसन आता अनुक्रमे पाचव्या, सहाव्या, आठव्या, नवव्या, 18 व्या आणि 35 व्या क्रमांकावर आहेत.

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टाररचा नुकताच रिलीज झालेला 'स्त्री 2' रिलीज झाल्यामुळे चर्चेत आहे. हा हॉरर कॉमेडी चित्रपट दररोज कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे आणि नवनवे विक्रमही रचत आहे. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 2024 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला,

13व्या दिवशी चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही पोहोचला आहे. 'स्त्री 2'चा 14 दिवसांत एकूण 424.05 कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow