देवरुखमध्ये रानभाजी महोत्सव, पाककला स्पर्धा

Aug 30, 2024 - 14:00
 0
देवरुखमध्ये रानभाजी महोत्सव, पाककला स्पर्धा

देवरुख : महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय संगमेश्वर यांचेमार्फत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धा माटे भोजने सभागृहात पार पडली. पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दत्तकृपा बचत गट तुळसणीने पटकावला. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन बळीराजा शेतकरी संघटना प्रमुख अशोक जाधव यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी आपल्या दैनंदिन आहारातील रानभाज्यांचे महत्त्व व त्यांची वैशिष्ट्ये व विक्री व्यवस्था याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. नाईकवडे यांनी रानभाजी आयोजित करण्याचे महत्त्व सांगितले. प्राध्यापक निर्मळ यांनी रानभाज्यांची ओळख याविषयी सादरीकरण केले.

रानभाज्यांचे मूल्यवर्धन व विक्री याविषयी मार्गदर्शन अशोक जाधव व कुणाल अणेराव यांनी केले. महोत्सवात ३० प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:28 PM 30/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow