चिपळूण : भंगार चोरीप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल

Sep 3, 2024 - 15:50
Sep 3, 2024 - 16:01
 0
चिपळूण : भंगार चोरीप्रकरणी तीन महिलांवर गुन्हा दाखल

चिपळूण : शहर परिसरात पहाटेच्यावेळी भंगार गोळा करणाऱ्या व्यावसायिकांकडून चोरी होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहरात ठिकठिकाणी अशा चोऱ्या घडून येत आहेत. या प्रकरणी तीन संशयित महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

हा प्रकार सीसीटीव्हीत दिसून आल्याने अधिक तपास पोलिस करीत आहेत. ही घटना ३० ते ३१ ऑगस्टदरम्यान बहादूरशेख नाका येथे घडली. शहरातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे तर उड्डाण पुलाचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी बॅरिकेटस्साठी लावलेले पत्र्याचे ड्रम व लोखंडी साहित्य अज्ञात महिलांनी चोरून नेले आहे. यामध्ये ७ हजार ५०० रूपयांचे चार ड्रम व ७० किलो वजनाचे स्टील चोरीस गेले आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow