हद्दपार केलेला तरुण चिपळुणात आढळला

Aug 31, 2024 - 10:44
 0
हद्दपार केलेला तरुण चिपळुणात आढळला

चिपळूण : चिपळूण पोलिस उपविभागातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबत येथील प्रांताधिकाऱ्यांचे आदेश असताना संबंधित यंत्रणेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हद्दपार केलेली व्यक्ती चिपळुणात आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जुएव जमील सय्यद (२६) असे त्याचे नाव आहे. तो मिरजोळी येथे पोलिसांना आढळून आला. ही घटना दि. २८ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी पोलिस हवालदार समिधा पांचाळ यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 31-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow