सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडेंची तडकाफडकी बदली

Sep 3, 2024 - 10:42
 0
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडेंची तडकाफडकी बदली

◼️ शिवपुतळा कोसळण्याचं प्रकरण ताज असतानाच सरकारकडून आदेश जारी

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच राज्य सरकारने सोमवारी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली केली. 

तावडे यांची पुणे येथील राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचाही समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow