Ratnagiri : खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशीही मासेमारी ठप्प

Sep 3, 2024 - 10:54
 0
Ratnagiri : खराब हवामानामुळे दुसऱ्या दिवशीही मासेमारी ठप्प

रत्नागिरी : समुद्रात मासेमारी करण्यासाठी दुसऱ्या दिवशीही हवामान अनुकूल नसल्याने सोमवारीही एकही पर्ससीन नेट मासेमारी नौका समुद्रात गेली नाही. इतरही पारंपरिक नौका बंदरातच उभ्या होत्या. 

रविवार, १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारीला परवानगी आहे. पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारीला परवानगी आहे. पहिल्याच दिवशी समुद्रातील वादळी वाऱ्याच्या  इशाऱ्यामुळे पर्ससीन नेट मासेमारीचा मुहूर्त हुकला. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी वातावरण किंवा हवामान अनुकूल होईल आणि नौका समुद्रात मासेमारीसाठी पाठवता येईल अशी आशा नौका मालकांना होती. परंतु पहिल्या दिवसापेक्षा सोमवारी हवामान आणखी खराब झाले. समुद्रातील पाण्याला करंट, उंच लाटा, जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस असल्याने या दिवशीही नौका समुद्रात जावू शकल्या नाहीत. सोमवारी बहुसंख्य पारंपारिक मच्छिमार नौकासुद्धा मच्छिमारीसाठी जावू शकल्या नाहीत.

पर्ससीन नेट मच्छिमार नौका मालकांनी आपापल्या नौका समुद्रात पाठवण्याची आवश्यक ती सर्व पूर्व तयारी पूर्ण केली होती. मागील मासेमारीच्या हंगामात बहुसंख्य नौकांना अपेक्षित मासळी रिपोर्ट न मिळाल्याने नुकसान झाले होते. नवीन हंगामात हे नुकसान भरून निघेल, अशी अपेक्षा असतानाच मासेमारीचे पहिले दोन दिवस समुद्रातील हवामान अनुकूल नसल्याने वाया गेले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow