दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून लॅपटॉपची चोरी
चिपळूण : दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून लॅपटॉपची चोरी झाली आहे. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या ट्रेनमधून प्रफुल्ल प्रदीप महाडिक हे प्रवास करीत होते. यावेळी त्यांनी लॅपटॉप व पॉकेट असलेली सॅक वरच्या रॅकमध्ये ठेवली होती आणि ते झोपून गेले. सावर्डे येथे जाग आली असता त्यांनी वरच्या रॅकमध्ये आपली सॅक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे अज्ञाताने ती चोरून नेल्याचे कळताच त्यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांचे यामध्ये वीस हजारांचे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 03-09-2024
What's Your Reaction?