मंडणगड येथे 23 वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

Sep 3, 2024 - 14:53
Sep 3, 2024 - 14:56
 0
मंडणगड येथे 23 वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

मंडणगड : मंडणगड तुरेवाडी येथील फुलराणी सुधीर तांबिटकर (वय २३) या युवतीने १ सप्टेंबर २०२४ रोजी आपले राहते घरी सकाळी ११.३० ते २.३० वाजण्याचे सुमारास घरात कोणीही नसताना घराच्या सिलिंग फॅनला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही. 

या संदर्भात तिचे वडील सुधीर काशिराम तांविटकर यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्री. बाणे करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow