लांजातील भगवान ढेकणे यांनी घेतले काजूच्या जोडीला करटुल्याचे आंतरपीक

Sep 3, 2024 - 14:12
Sep 3, 2024 - 16:39
 0
लांजातील भगवान ढेकणे यांनी घेतले काजूच्या जोडीला करटुल्याचे आंतरपीक

लांजा : लांजा तालुक्यातील गवाणे येथील प्रगतिशील शेतकरी भगवान ढेकणे यांनी सुमारे एक एकरात काजू पिकात करटुलेची (काटले) शेती यशस्वीपणे करून येथील शेतकऱ्यांसाठी नवा आदर्श उभा केला आहे.

लांजा बाजारात या भाजीला मोठी मागणी आहे किलोसाठी २०० ते ३०० रुपये दर आहे अत्यंत औषधी आणि रानभाजी असलेली ही करटुले भाजी व्यावसायिक शेती म्हणून उदयास आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, जंगल डोंगरदऱ्यामध्ये काटुले आढळतात मात्र सहसा नजरेस न पडणारी, दुर्लक्षित असून, जाणकार व्यक्तींनाच ही ओळखता येतात, या गुणकारी फळभाजीचे पीक आता रत्नागिरी जिल्ह्यातही घेण्यात येणार आहे. लांजा तालुक्यातील गवाणे येथील शेतकरी भगवान ढेकणे यांनी (काटले) प्रायोगिक शेती केली आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले भगवान ढेकणे यांनी गवाणे गावी शेतीचे विविध प्रयोग केले आहेत. काजू पिकाच्या जोडीला आता आंतरपीक म्हणून करटुलेची शेती करण्याचा नवा प्रयोग केला आहे, कमी देखभाल खर्चात कमी कालावधीत चांगला दर मिळवून देणारे हे पीक असल्याचा अनुभव त्यांना आला आहे.

या भाजीला मोठी मागणी आहे. औषधी वनस्पती आणि विविध गुणधर्म आहेत. ढेकणे यांनी यूट्यू‌बवरून माहिती घेऊन करटुलांची लागवड केली. गेल्यावर्षी हातखंबा येथील रानातून बिया, कंद जगा करत दोन गुंठ्यात बिजोत्पादनासाठी लागपड केली होती.

व्यावसायिक उत्पादन घ्यावयाचे असल्याने मजुरांच्या सह्यय्याने परागीकरण केले. परिणामी, अपेक्षित फळे मिळाणे सुरू झाले. नैसर्गिक हिरव्या पोपटी रंग असलेल्या या अर्का भारत वाणाच्या करटील्याचे दिवसाआड ३० ते ४० किलो उत्पादन मिळत असल्याने शेतकरी भगवान ढेकणे यांनी सांगितले.

लागवडीनंतर या करटुलेची दीड महिन्यात उत्पादन सुरू झाले. जून ते ऑगस्ट दरम्यान तीनवेळा तोडणी झाली. लांजा येथे विक्री केली. त्याला २०० रुपयांपासून ते २५० रुपयोपर्यंत दर मिळाला.- भगवान ढेकणे शेतकरी लांजा

औषधी गुणधर्माची करटुले भाजी
वा भाजजेचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम घाट परिसरात आढळतात. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही काही प्रभागात लागवड केली जाते. वेलींना जमिनीत कंद असतात. भोपळ्याच्या कुळातील वनस्पती असून, जून ते ऑगस्टमध्ये फुले व त्यानंतर फळे तयार होतात डोकेदुखी, मूतखडा, विषवाचा, हत्तीरोग, आतडघांच्या तक्रारी, ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्रासनलिका दाड, उचकी, मूळव्याध यावर ही भावी गुणकारी आहे. करटूलेच्या फळाची भाजी कारल्यासारखीच असते. पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी बाजारात पाहण्यास मिळते. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकांवर भाजी हितावह असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:37 PM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow