रत्नागिरी : कंत्राटी वीज कामगारांचे प्रश्न सोडवणार; ना. उदय सामंत यांचे आश्वासन

Aug 23, 2024 - 10:19
 0
रत्नागिरी : कंत्राटी वीज कामगारांचे प्रश्न सोडवणार; ना. उदय सामंत यांचे आश्वासन

माखजन : रत्नागिरी जिल्ह्यात महानिर्मिती, महापारेषण, महावितरण विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कामगार जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी धरणे आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांच्या शिष्टमंडळाला कंत्राटी वीज कामगारांचे प्रश्न सोडवणार, असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सर्व कामगारांकडून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या निवासासमोर धरणे आंदोलने करण्यात आली. अनेक वर्षे उलटून देखील तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करावे लागते या निषेधार्थ हे धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यशासनाने सरकारी सेवेत कायम करून घ्यावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले.

कंत्राटी कामगारांना विनाअट सेवेत सामावून घ्या आणि राज्यशासनाने वेतन आयोग आणि नियमावली लागू करा, अशी मागणी आंदोलकांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करताना केली. हा प्रश्न न सुटल्यास २४ रोजी राज्यातील महावितरण, महापारेषण, महानिर्मितीचे कंत्राटी कामगार नागपूर येथील रेशीमबाग येथून पायी मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाणार असून, याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 23/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow