लांजा : पादचारी महिलांना अज्ञात वाहनाची धडक; चालकाचे पलायन

Sep 3, 2024 - 15:55
Sep 3, 2024 - 16:05
 0
लांजा : पादचारी महिलांना अज्ञात वाहनाची धडक; चालकाचे पलायन

लांजा : लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे दोन पादचारी महिलांना अज्ञात वाहनाने धडक देऊन पळ काढल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. या अपघातात पादचारी दोघी महिला जखमी झाल्या आहेत. मात्र या बावत १ सप्टेंबर रोजी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लांजा पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आलेल्या दोघीही महिला लांजा येथे कामानिमित्त असून, त्या सायंकाळी बस ने वेरवली गावातील राम मंदिर बस स्टॉपवर उतरल्या. बसमधून उतरून त्या रस्त्याने डाव्या बाजूने पुढे चालत जात असताना एक अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कार ने त्या दोघींनाही जोरदार धडक दिली. जबर धडक बसल्याने दोघीही महिला रस्त्यावर आदळल्या. जोरदार आरडा ओरडा झाल्याने अज्ञात वाहन चालकाने न थांबता तेथून पलायन केले. या अपघातात समिता शिंदे (२५) आणि नियती चंद्रकांत शिंदे (१९) दोघीही राहणार वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी. दोघींनाही उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार रेवणे करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:29 03-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow