एसटी संपाचा खेडवासीयांना फटका

Sep 4, 2024 - 10:25
 0
एसटी संपाचा खेडवासीयांना फटका

खेड : ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने येथील बस स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाला. 

गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्यामुळे चाकरमानी गावात येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे भागातील नोकरीनिमित्ताने स्थायिक झालेले चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रेल्वेने खेड स्थानकात उतरून एसटीने आपल्या गावी पोचतात. मात्र एसटी संपामुळे चाकरमानी प्रवाशांचे हाल झाले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संप पुकारला आहे. यामुळे एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

दरम्यान या संपात काही कर्मचारी संघटना सहभागी न झाल्याने लांब पल्ल्याच्या व चिपळूण मार्गांवर काही फेऱ्या सुरू आहेत. या संपाचा फटका सर्वसामान्य कामगार वर्गाला बसला असून नियमित घरकाम करण्यासाठी सवलतीच्या दरात ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना खासगी वडाप करणाऱ्या वाहनातून तिप्पट रक्कम मोजून प्रवास करावा लागला. तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटीच्या नियमित फेऱ्या रद्द झाल्याने बस स्थानकात ताटकळत बसण्याची वेळ आली. गणेशोत्सव काळात भक्तांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. पण वाहतुकीसाठी एसटी उपलब्ध नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow