एसटी कर्मचारी आनंदात असला पाहिजे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका : मंत्री उदय सामंत

Sep 4, 2024 - 11:05
 0
एसटी कर्मचारी आनंदात असला पाहिजे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भूमिका : मंत्री उदय सामंत

मुंबई : मुख्यमंत्र्यांकडेच परिवहन विभाग आहे. त्यांच्या सूचनेनुसारच एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. एक गोष्ट समजत नाही.

गणपती उत्सव हा इतका मोठ्या ताकदीचा उत्सव साजरा केला असतो. असे असताना अशा प्रकारचे आंदोलन होणे हे कितपत योग्य आहे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. गणेशोत्सवात कोणत्याही नागरिकाला जाण्या-येण्यास त्रास होऊ नये, ही सरकारची भूमिका आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पत्रकारांशी बोलताना उदय सामंत यांनी बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली. चार वर्षापूर्वीच्या संपात माझ्या सारख्याच कार्यकर्त्याने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. तशी भूमिका घेण्याचा मी प्रयत्न केला. मी त्यांना विनंती केली की, सरकारमधील मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेण्याबाबत पत्र देतात, त्यामध्ये खरेपणा आहे. बुधवारी मुख्यमंत्री तुमच्यासोबत बैठक घेतील तेव्हा चर्चा करा. तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल, अशाप्रकारची भूमिका मी त्यांच्यापुढे मांडली. आमचे सहकारी आमदार सदाभाऊ खोत किंवा आमदार गोपीचंद पडळकर असतील, त्यांच्यासोबतही मी चर्चा करणार आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचारी आनंदात असला पाहिजे ही एकनाथ शिंदेंची भूमिका

एसटी कर्मचारी कायम स्वरुपी आनंदात असला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करतो असे सांगितले होते. जनतेचा विशेषत: गणेश भक्तांचा विचार करावा, ही माझी विनंती आहे. सरकार आपल्या निर्णाबाबत सकारात्मक आहे. आपणही गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी संप मागे घ्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्की सकारात्मक होते, आहे आणि भविष्यातही कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची राहिलेली आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाबाबत काही निर्णय घेतले गेले. महिलांसाठी अर्धतिकीट असेल, ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना मोफत प्रवास, यामुळे जो डिफरन्स आहे, तो शासनाने द्यायला सुरुवात केली. गेले कित्येक वर्ष एसटी महामंडळ जे मागे वाटत होते, त्याचे नुकसान भरण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो. सगळेच एसटी महामंडळ नफ्यामध्ये आले आहे, असा दावा नाही. पण या योजनांमुळे एसटी महामंडळाला बऱ्यापैकी शासनाकडून निधी उपलब्ध होत आहे, हे सगळ्या संघटनांना सांगितले. नवीन गाड्यांच्या बाबतीतही संघटनांशी चर्चा झाली. याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. मुख्यमंत्र्यांनी उद्या सात वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीचे पत्र देण्याचा प्रयत्न आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे डेपोतील जे कर्मचारी असतात, त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय देतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी देत बैठक संपली, असे उदय सामंत यांनी सांगितले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 04-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow