दापोलीत २१ वाड्यांना टँकरने पाणी

Jun 5, 2024 - 11:16
 0
दापोलीत २१ वाड्यांना टँकरने पाणी

हर्णे : पाऊस लांबल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळीत घट झाली आहे. त्यामुळे दापोलीत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील १५ गावांतील २१ वाड्यांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. या गावांना २ टँकरने पाणी पुरवले जात आहे.

पाण्याची पातळी खालावल्याने टंचाईग्रस्त गावांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईमुळे पाणी विक्रेते व टँकर मालक यांना सुगीचे दिवस आहेत. दापोलीतही पूर्व मोसमीच्या सरी कोसळल्या असल्या पण पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढत आहे. पाऊस लांबला तर जलसंकट येईल, अशी परिस्थिती उद्भवली आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे, विहिरी, नळपाणी योजनेच्या विहिरींनी तळ गाठला. दापोली पंचायत समितीकडे अनेक ग्रामस्थांनी टँकरची मागणी केली आहे. एक शासकीय आणि एक खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

मॉन्सून वेशीवर आल्याने दिलासा
दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसांत गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता भारतीय वेधशाळेने व्यक्त केली आहे. सात जूनपासून कोकणात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मॉन्सूनने सोमवारी तीन जूनला कर्नाटक रायलसीमा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणाचा काही भाग व्यापला आहे. चार ते पाच दिवसांत मॉन्सूनचे गोवा आणि दक्षिण महाराष्ट्रात आगमन होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow