भरणेत चोरट्याला रंगेहाथ पकडले

Jun 7, 2024 - 12:17
Jun 7, 2024 - 15:22
 0
भरणेत चोरट्याला रंगेहाथ पकडले

 खेड : खेड-भरणे मार्गावरील आठवडा बाजारात दुकानात खरेदीचे पैसे देताना भंगार गोळा करणाऱ्याने २० हजार रुपये चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरी करीत असताना फिर्यादी यांनी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हिरासिंग राठोड असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ४) घडली. संयाजी बापू गायकवाड हे बाजार खरेदी करत असताना त्यांच्या बॅगेत २० हजार एवढी रक्कम होती. गर्दीचा फायदा घेत संशयित ती रक्कम बॅगेतून काढून स्वतःच्या पिशवीत भरत असताना पैशाचा बंडल खाली पडला त्यावेळी त्याला पकडले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:54 07-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow