मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधून चार लाखांच्या दागिन्यांची चोरी
संगमेश्वर : मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबवून चार लाख रुपयांचे दागिनेसह पैसे चोरीला गेल्याची फिर्याद संगमेश्वर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. सदरची घटना आरवली रेल्वेस्थानकाजवळ घडली. याबाबत शेखर बसप्पा सुवर्णा (वय ७२ रा. मुलुंड) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शेखर आणि त्यांची पत्नी अरुणा शेखर सुवर्णा मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ३० ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट १ वा. च्या सुमारास मौजे कर्नाटक ते ठाणे असा मत्स्यगंधा एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना गाडी आरवली रेल्वेस्टेशनदरम्यान अरुणा यांच्या सीटवर डोक्याजवळ ठेवलेली शोल्डर पर्स चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन लांबवली. त्या पर्समध्ये ठेवलेले ५० हजार किमंतीची एक सोन्याची चेन, १ लाख रुपयांचे दागिने, अंदाजे ७५ हजार किमतीची एक सोने व मोती अशी सोन्याच्या तारेत गुंफलेली माळ, चित्र असलेली गोल आकाराचे पेन्डल, ९० हजार किंमतीच्या सोन्याच्या ६ बांगड्या, ७० हजार किमंतीचे सोने व मोती अशी असलेली सोन्याच्या २ बांगड्या वजन असा सुमारे ४ लाख ८९० रुपयांचे किमती दागिने चोरून नेले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 04/Sep/2024
What's Your Reaction?