खेड : कुळवंडीत घरफोडी; १३ हजारांचा ऐवज लांबविला

Aug 5, 2024 - 11:19
 0
खेड : कुळवंडीत घरफोडी; १३ हजारांचा ऐवज लांबविला

खेड : कुळवंडी- जांभुळवाडी येथील बंद घर फोडून चोरट्याने १३ हजार ३५० रुपयांचा ऐवज पळविला. ही घटना शनिवारी (ता. ३) सकाळी साडेनऊच्या सुमारास कुळवंडी जांभुळवाडी येथे घडली. चोरट्याविरुद्ध खेड पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार अनिल कदम (२०, सध्या रा. स्वामी समर्थ कॉलनी वेरळ, ता. खेड) यांच्या घराचा दरवाजाचे व त्याच्या बाहेर असलेल्या सेफ्टी डोअरचे कुलूप व कोयंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील १० हजारांचा टीव्ही, तीन हजारांचे सिलिंडर टाकी व एक रिकामी सिलिंडर, लोंखडी कोयती आदी साहित्य चोरून नेले. या प्रकरणी ओंकार कदम यांनी खेड पोलिसांत तक्रार दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 05-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow