लांजा : बेर्डेवाडी धरणात हजारो टन दगडी खडीचा ढिगारा

Sep 4, 2024 - 15:27
 0
लांजा : बेर्डेवाडी धरणात हजारो टन दगडी खडीचा ढिगारा

लांजा : तालुक्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या वेरवली बेर्डेवाडी धरण प्रकल्प क्षेत्रात खेरवसे गावा ठिकाणी हजारो टन काळा दगडी खडीचा ढिगारा मागील ४५ वर्षे पाण्याखाली अडकून पडला आहे. धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर ४० ते ५० फूट उंच असणारा हा काळ्या खडीचा विगारा नजरेस पडतो, ही खडी बाहेर काढल्यास या खडीपासून शासनाला लाखो रुपयांचा महसूल मिळू शकतो. मात्र ही खड़ी बाहेर काढणार कोण..? कोकण रेल्वे की लपू पाटबंधारे याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

कोकण रेल्वेच्या वेरवली बेर्डेवाडी ते आडवली या ४ किमीच्या बोगद्याच्या काम सुरू असताना पासून ही खडी पडून आहे. ४० ते ४५ वर्षाहून अधिककाळ खडीचा (डबर) ढीग जैसे थे पडून आहे. खडी कोकण रेल्वेच्या मालकीची असल्याचे समजते. मात्र धरण क्षेत्राच्या पाण्यात अनेक वर्षे अडकून पडली आहे. त्यामुळे हजारो टन पाण्यात पडून असणारी खडी लघु पाटबंधारे की कोकण रेल्वेची असा संभ्रम होत आहे.

वेरवली धरणाला गेली ४१ वर्ष होत आहेत. तत्पूर्वीच वेरवली ते आडवली भागात कोकण रेल्वेच्या कामाची सुरुवात या कालावधीमध्ये झाली. वेरवली बेर्डेवाडी ते आडवली असा लांबलचक असलेल्या रेल्वे बोगद्याचे काम सुरू असताना कामगार व वाहतूक यंत्रणा ना सोयीस्कर आणि खनिज कामासाठी जलद पोहचावे यासाठी खेरवसे गावामधून लहान बोगदा तयार करण्यात आला होता. बोगदा खोदकाम व रेल्वे ट्रैक जोडणीचे काम जलद सुरू राहिल्याने लागणारे साहित्य, ट्रक, गाड्यांची वाहतूक, कामगारांना ने आण करण्यासाठी हा बोगदा म्हणजे जलद कामाचा एक दुवा होता.

याच ठिकाणाहून बोगद्याच्या लागणारी खाडी वाहून नेली जात होती. वेरवली खेरवसे ते आडवली भागातील रेल्वेचे काम संपुष्टात आल्याने येथील साधन सामुग्री संबंधित प्रशासनाने पुढे सरकवली. त्यानंतर खेरवसे येथील तयार केलेला लहान बोगदा कालांतराने दगड, मातीने बंद करण्यात आला. बंद करण्यात आलेला बोगदा बेर्डेवाडी धरणाच्या पाण्याने व्यापला आहे.

याच दरम्यान वेरवली बेर्डेवाडी धरण प्रकल्प सुरू होता त्यानंतर लघुपाटबंधारे विभागाने वेरवली बेर्डेवाडी धरणाला सुरुवात केली. सद्या बोगदा पाण्याखाली गेला असून हजारो टन काळी खड़ी (डबर) पाण्याखाली पडून आहे. धरणाचे पाणी कमी इसल्यावर खडीचा मोठा साठा दिसून येतो. मात्र, पाठबंधारेच्या धरण पाण्याखाली गेलेला खाडीचा साठा नेमका कोणाचा असा प्रश्न पडला आहे.

जुन्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊ
लघु पाटबंधारे विभागाशी याबाबत संपर्क साधला असता बेर्डेवाडी धरण क्षेत्रात पाण्याखाली असलेला काळा दगडी साठा पाटबंधारे विभागाचा नसल्याचे सांगण्यात आले. कोकण रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांशी संपर्क साथला असता ज्या ठिकाणी खडी साठा आहे त्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करू व याबाबत जुन्या अधिकाच्यांकडून माहिती घेऊ लवकरच खडीसाठा आहे त्याठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करू, असे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow