रत्नागिरी : जिल्हा तलवारबाजी स्पर्धेत ६५ खेळाडूंचा सहभाग

Sep 4, 2024 - 15:05
 0
रत्नागिरी :  जिल्हा तलवारबाजी स्पर्धेत ६५ खेळाडूंचा सहभाग

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरीद्वारा आयोजित जिल्हास्तरीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा दि. २ व ३ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे यशस्वीरित्या झाल्या. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमधील फॉइल, इप्पी, सेबरा प्रकारात झाली. एकूण ६५ खेळाडू सहभागी झाले होते.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विजय शिंदे (प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी), गणेश जगताप (क्रीडा अधिकारी), अक्षय मारकड (क्रीडा अधिकारी), समिधा झोरे (रत्नागिरी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या सचिव) उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तांत्रिक अधिकारी म्हणून मार्तंड झोरे, पंच म्हणून निखिल कदम, पार्थ बावदाणे, श्रद्धा बिरवाडकर, सहाय्यक म्हणून सूरज मोहिते, समर्थ गुंजवटे, वरद प्रभुदेसाई, वरद पाथरे यांनी मेहन घेतली.

या स्पर्धेचा निकाल असा :
१४ वर्षांखालील मुले (फॉईल) प्रथम - गौरेश ठीक, द्वितीय- समर्थ बनप, (ईप्पी) प्रथम - गौरेश ठीक, द्वितीय - समर्थ बनप. मुली (फॉईल) प्रथम नारायणी कवतिके, द्वितीय- वेदा शिंदे, तृतीय- राधिका सुर्वे, (ईप्पी) प्रथम नारायणी कवतिके, द्वितीय- वेदा शिंदे, तृतीय - स्वप्नाली गावडे, (सेबर) प्रथम स्वप्नाली गावडे.

१७ वर्षांखालील मुले (फॉईल) प्रथम तन्मय बंडबे, द्वितीय प्रार्थन कामरेकर, तृतीय प्रतीक पवार, (इप्पी) प्रथम श्रीरंग सनगरे, द्वितीय अथर्व फणसोपकर, तृतीय - प्रतीक पवार, (सेबर) प्रथम रुद्र बोरकर, द्वितीय तन्मय बंडबे, तृतीय-अथर्व फणसोपकर,

१७ वर्षांखालील मुले (फॉईल) 
श्रिया झोरे, द्वितीय - दुर्वा तळेकर, तृतीय तीर्था सावंत, (इप्पी) प्रथम श्रिया झोर, द्वितीय दुर्वा तळेकर, तृतीय - तीर्था सावंत. (सेबर) प्रथम आदिती देसाई, द्वितीय तनया शिरवळकर, तृतीय - पूर्वा माळगुडकर.

१९ वर्षांखालील मुले (फॉईल) प्रथम - श्रेयस मोहिते, द्वितीय- दीपक नेवरेकर, (इप्पी) प्रथम श्रेयस मोहिते, द्वितीय निशांत नेवरेकर, (सेबर) प्रथम निशांत नेवरेकर.

१९ वर्षांखालील मुली (फॉईल) प्रथम - पूर्वा कांबळे द्वितीय- राशी पवार, तृतीय श्रुतिका मोहिते, (इप्पी), प्रथम पूर्वा कांबळे, द्वितीय- श्रुतिका मोहिते, तृतीय- राशी पवार,


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 04/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow