दिल्लीत NDA ची बैठक, अजित पवारांची दांडी; राजकीय घडामोडींना वेग..

Jun 5, 2024 - 11:46
 0
दिल्लीत NDA ची बैठक, अजित पवारांची दांडी; राजकीय घडामोडींना वेग..

मुंबई : लोकसभेच्या निकालानानंतर(Lok Sabha Election Result) आज दिल्लीत खलबतं होणार आहे. दिल्लीत आज एनडीए (NDA) आणि इंडिया आघाडीची (INDIA) महत्त्वाची बैठक होणार आहे. एनडीएलला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत आज बैठक होणार आहे..

या बैठकीला एनडीएचे घटक पक्षही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) या बैठकीला हजर राहणार आहेत..अजित पवार या बैठकीला जाणार नाहीत.

बहुमत मिळाल्यानंतर आज दिल्लीत एनडीएची खलबत झाली. सत्तास्थापनेपूर्वी एनडीएच्या घटक पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. सर्व खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या सर्व विजयी खासदारांव्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांना सकाळी दिल्लीला पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. NDA, TDP, JDU, HAM, LJP, RLD, JDS, जनसेना या सर्व घटक पक्षांशी बोलणी झाली आहेत. आजच्या NDA बैठकीत सरकार स्थापनेची ब्लू प्रिंट तयार होईल. आगामी सरकारमध्ये सर्व मित्रपक्षांना मानाचे स्थान दिले जाईल, खुद्द पंतप्रधान सर्व पक्षांच्या प्रमुखांचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत.

इंडिया आघाडीची दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

दुसरीकडे इंडिया आघाडीचीही दिल्लीत आज महत्त्वाची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीला एकूण 232 जागा मिळाल्यात यानंतर आता पुढची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत आणि अरविंद सावंत या बैठकीला जाणार आहेत. तर शरद पवारही या बैठकीला हजर राहणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची बैठक

केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीला कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड उपस्थित राहणार का, याकडे लक्ष आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची बैठक आज दुपारी 12 वाजता होणार आहे, पंतप्रधान मोदी ही बैठक घेणार आहेत. वर्तमान मंत्र्यांची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असणार आहे. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 05-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow