राज्यातील नगर परिषद कर्मचाऱ्यांचे मुंबईत उद्या निषेध आंदोलन

Sep 5, 2024 - 11:11
 0
राज्यातील  नगर परिषद कर्मचाऱ्यांचे  मुंबईत उद्या निषेध आंदोलन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदेच्या नगरपालिका, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचा निषेध करण्यासाठी व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांचे सर्व अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी (ता.६) मुंबईत धडकणार आहेत. आझाद मैदान येथून ते यावेळी बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.

राज्यभर २९ ऑगस्टपासून हे सर्व कर्मचारी आंदोलन करत आहेत. तरीही नगरविकास विभाग लक्ष देत नसल्याने सर्व कर्मचाऱ्यात संतापाची भावना आहे. सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये सुमारे तीन हजार अधिकारी व ६० हजारांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, आश्वासक प्रगती योजनेचा लाभ द्यावा, आगाऊ वेतन अनुदान एक महिना अगोदर द्यावे, आदी मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची नोटीस पंधरा दिवस अगोदर देऊनही, नगर विभागाने कोणतीच दखल घेतली नाही. उलट या आंदोलनात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईची भीती दाखवली जात आहे, असा आरोप संघटनेचे राज्याध्यक्ष कैलास चव्हाण यांनी केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 05/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow