रत्नागिरी : कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन

Aug 24, 2024 - 12:13
 0
रत्नागिरी : कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन

त्नागिरी : चार दशकांची दीर्घ परंपरा लाभलेल्या कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

याप्रसंगी अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. दत्तात्रय वालावलकर, रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १५ दामले विद्यालयाचे शिक्षक योगेश कदम, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. प्रकाश पालांडे, नवनिर्माण हायच्या माजी मुख्याध्यापिका सौ. नजमा मुजावर, नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील यांच्यासह स्पर्धक, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवारी माध्यमिक गटातील मराठी आणि इंग्रजी माध्यमातील वक्तृत्व स्पर्धा झाली. मराठी माध्यमाचे गटाचे परीक्षण शिक्षक योगेश कदम आणि प्रा. प्रकाश पालांडे यांनी, तर इंग्रजी माध्यमाचे परीक्षण प्रा. दत्तात्रय वालावलकर आणि सौ. नजमा मुजावर यांनी केले.

स्पर्धेचे संयोजक प्रा. सचिन टेकाळे यांनी शब्दामध्ये असलेली ताकद आणि शब्दांची किमया प्रास्ताविकातून मांडली. डॉ. जगदाळे यांनी नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आणि महाविद्यालयातील उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. संस्थेच्या संचालिका सौ. हेगशेट्ये यांनी स्पर्धेच्या ४२ वर्षांच्या प्रवासाची माहिती दिली. आजच्या स्पर्धेतून उद्याचा वक्ता तयार व्हावा यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे त्या म्हणाल्या.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 24-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow