गणपतीपुळे मंदिरात श्रींना सहस्त्र मोदक समर्पण

Sep 6, 2024 - 10:41
 0
गणपतीपुळे मंदिरात श्रींना सहस्त्र मोदक समर्पण

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील संस्थान श्री देव गणपतीपुळे मार्फत स्वयंभू गणपती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे भाद्रपदी गणेशोत्सव बुधवारी, ४ सप्टेंबरला सुरू झाला आहे. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी समस्त भक्तगणांच्या वतीने श्रींना सहस्र मोदक समर्पण सेवा पूर्ण झाली.

यावेळी समस्त भक्तगण सुखी समाधानी होऊ देत, उत्सव निर्विघ्नपणे पूर्ण होउ दे, अशीच आपली सेवा यापुढे सुद्धा घडू दे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी उपस्थित होते. तसेच ही सहस्र मोदक समर्पण सेवा गणपतीपुळे मंदिराचे पंच श्रीहरी रानडे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी उपस्थित भक्तगणांनी सहस्र मोदक समर्पण सेवेत आपला सहभाग घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 AM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow