करबुडे-उक्षी मार्गावर बोलेरो कोसळला पऱ्यात; चालक जखमी

Sep 6, 2024 - 11:22
Sep 6, 2024 - 11:49
 0
करबुडे-उक्षी मार्गावर बोलेरो कोसळला पऱ्यात; चालक जखमी

रत्नागिरी : करबुडे उक्षी मार्गावर बोलेरोच्या अपघातात चालक जखमी झाल्याची घटना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ऋषिकेश लक्ष्मण पवार (२६, तुळसणी, देवरुख) असे जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे. 

सोमवारी ऋषिकेश पवार हा आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच ०८ एपी ५३००) घेऊन हातखंबा ते संगमेश्वर चालला होता. महामार्गावर खड्डे असल्याने त्याने उक्षी मार्गाचा अवलंब केला. करबुडे फाट्यावरून उक्षी मार्गे जाताना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना गाडी मातीवरून घसरून थेट पऱ्यात कोसळली. यामध्ये चालक ऋषिकेश याला किरकोळ दुखापत झाली. अपघातात गाडीचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. चालकाला बाहेर काढण्यात आले. या बाबतची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 06-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow