मुंबई-गोवा महामार्गाचे अर्धवट काम; वाहनांच्या ५ कि.मी.पर्यंतच्या रांगा

Sep 6, 2024 - 11:23
Sep 6, 2024 - 11:27
 0
मुंबई-गोवा महामार्गाचे अर्धवट काम; वाहनांच्या ५ कि.मी.पर्यंतच्या रांगा

खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची लांबच गर्दी पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भरणे नाका परिसरात तर गुरुवारी सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, या ठिकाणी पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईसह पुणेकर मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. 

मुंबई - गोवा मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी वाहने वळवण्यात आलेली आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यातून मार्ग काढताना वाहन चालकांची पुरती दमछाक होत आहे. रामवाडी, कोलाड, इंदापूर, माणगाव, महाड या दरम्यान महामार्गाचे काम अर्धवट स्थितीत असून खेड वरील भरणे नाक्यानजीक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असून या वाहतूक कोंडीमुळे पाहायला मिळत आहेत. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कशेडी टॅप च्या वाहतूक पोलीस व खेड येथील येथील पोलीस प्रशासनाने ही कोंडी सोडवण्यासाठी महामार्गावर अधिक पोलीस फौजफाटा तैनात केला आहे. या काळात अवजड वाहनांना काही काळासाठी जरी बंदी केली असली तरी देखील महामार्गाच्या झालेल्या या अर्धवट कामामूळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow