लांजात उद्या १३ हजार ५४० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

Sep 6, 2024 - 12:00
Sep 6, 2024 - 12:03
 0
लांजात उद्या १३ हजार ५४० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

लांजा : लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. यावर्षी लांजा शहरासह तालुक्यात सात सार्वजनिक गणेशोत्सवांसह १३ हजार ५४० घरगुती गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.

कोकणात गणपती उत्सव हा मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. यावर्षी ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत हा गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. शहरासह तालुक्यात एकूण सात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये भांबेड येथील नवयुग उत्कर्ष युवक मंडळ, कोर्ले राजा, बेनी येथील साईगणेश मंडळ, खानवली कोल्हेवाडी येथील वक्रतुंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्हेळ येथील नवनिर्माण तरुण मित्र मंडळ, कुवे येथील उत्कर्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि लांजा पोलिस ठाणे असे सात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 06/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow