Ratnagiri : अंगणवाडी, मदतनीस पदासाठी 23 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी 2 मार्फत अंगणवाडी मदतनीस रिक्त पद भरावयाची आहेत. इच्छूक स्त्री स्थानिक उमेदवारांनी 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना रत्नागिरी २, शंकेश्वर पार्क, बी विंग, रुम नं.७, जिल्हा परिषद शेजारी,ता.जि.रत्नागिरी येथे अर्ज करावेत, असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रत्नागिरी २ यांनी केले आहे.
ग्रामपंचायत करबुडेमध्ये कुरबुडे धनगरवाडी आणि कुरबुडे कुंभारवाडी अंगणवाडी केंद्र, आगवे येथे आगवे धनगरवाडा, विल्ये येथे विल्ये बौध्दवाडी, जयगड ग्रामपंचायतीमध्ये जयगड सडेवाडी, धामणसे येथे धामणसे रेवाळेवाडी अंगणवाडी केंद्र, नेवरे ग्रामपंचायती नेवळे ढोकमळे, भगवतीनगरमध्ये निवेंडी भगवतीनगर, चाफे ग्रामपंचायतीमध्ये चाफे धनगरवाडी आणि चाफे बौध्दवाडी अंगणवाडी केंद्र, गडनरळ ग्रामपंचायतीमध्ये वैद्यलागवण आणि कोळीसरे कोठारवाडी अंगणवाडी केंद्र, कासारवेली ग्रामपंचायतीमध्ये कासारवेली सोनारवाडी , वेतोशी ग्रामपंचायतीमध्ये वेतोशी धनगरवाडी आणि वेतोशी नं.२ अंगणवाडी केंद्र आणि जांभरुण ग्रामपंचायतीमध्ये जांभरुण नं १ अंगणवाडी केंद्र या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस पदे भरावयाची आहेत.
शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस पदासाठी इयत्ता 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक राहील. (गुणपत्रक आवश्यक)
वास्तव्याची अट : ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तरन महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे मधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
वयाची अट : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी (By Nomination) वयोमर्यादा किमान १८ व कमाल ३५ वर्षे अशी राहील. तथापि, विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल ४० अशी राहिल.
विधवा/अनाथ असलेबाबत दाखला (असल्यास दाखला), लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये, जातीचा दाखला असल्यास आवश्यक, अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असल्यास दाखला आवश्यक, शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र आवश्यक (MSCIT).
आवश्यक माहितीसाठी सुट्टीचे दिवस वगळून इतर कार्यालयीन दिवशी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत संपर्क साधावा. नमुन्यातील परिपूर्ण अर्ज स्विकारले जातील. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व अपूर्ण अर्जाबाबत पत्रव्यवहार केला जाणार नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 10-08-2024
What's Your Reaction?