खेड : जगबुडी नदी इशारा पातळी स्थिरावली

Jun 28, 2024 - 10:11
Jun 28, 2024 - 10:18
 0
खेड : जगबुडी नदी इशारा पातळी स्थिरावली

खेड : तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७१.२८ मिमीएवढा पाऊस झाला असून एकूण ७११. १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सर्वाधिक पाऊस लवेल मंडळात १०६ मिमी, तर आंबवली मंडळामध्ये सर्वांत कमी २४ मिमी पाऊस गेल्या चोवीस तासांत झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस समाधानकारक असल्यामुळे शेतकरीवर्गात उत्साह आहे. जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. बुधवारी (ता. २६) रात्री १० वा. जगबुडीने यावर्षीची सर्वोच्च पातळो ५.७० मीटर गाठली होती; मात्र त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीपातळीत घट झाली असून, आज सकाळी १० वाजेपर्यंत ५. १० मीटरएवढी स्थिरावली होती.
त्यानंतर संध्याकाळी ५ मीटर झाली. जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी इशारा पातळीवर स्थिरावल्यामुळे व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आठ दिवस सुरू असलेल्या पावसात नांदीवली विठ्ठलवाडी येथील विजय जनार्दन चव्हाण यांच्या घराचे छप्पर कोसळून अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यातील भरणे मंडळ ८१ मि.मी., कुळवंडी मंडळ ८१ मि.मी., खेड ७६ मि.मी. तर शिशी मंडळ ६३ मि.मी. पावसाची नोंद आज सकाळी ६ वाजेपर्यंत झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 28/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow