खेड : नातूनगर येथे रिक्षाला धडकप्रकरणी बसचालकावर गुन्हा

Sep 10, 2024 - 10:49
Sep 10, 2024 - 14:51
 0
खेड :  नातूनगर येथे  रिक्षाला धडकप्रकरणी बसचालकावर गुन्हा

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील वावेतर्फे नातूनगर येथे रिक्षाला धडक देत पाचजणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रवीणकुमार राजाराम कुंभार (४१, रा. गडहिंग्लज) या बसचालकावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरसिंग श्रीधर दळवी हे रिक्षात प्रवाशांना बसवून वावेतर्फे नातूनगर येथे उभे होते. याचवेळी बसमधून प्रवाशांना घेऊन येणारी प्रवीणकुमार कुंभार यांच्या ताब्यातील बसची धडक रिक्षाला बसली. या अपघातात पांडुरंग मोरे, दीक्षा दीपक संजना, सतीश बुरटे, सोनल शिंदे, अश्विनी अनंत भुवड (रा. नातूनगर) हे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच जखमीसह रिक्षाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा ठपका बसचालकावर ठेवला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:15 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow