लांजा : शिरवली गावात गवारेड्यांच्या कळपाकडून भातशेतीचे नुकसान

Sep 2, 2024 - 09:58
 0
लांजा : शिरवली गावात गवारेड्यांच्या कळपाकडून भातशेतीचे नुकसान

लांजा : पावसाळ्यात भातशेती सुरू झाली की, दरवर्षी गवारेडे सह्याद्री खोऱ्यातून लांजा तालुक्यातील लोकवस्ती भागात दिसून येत असतात. तालुक्यातील शिरवली गावात गवारेड्यांनी भात शेतीचे नुकसान केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

लांजा तालुक्यातील तळवडे, शिपोशी, भांबेड, शिरवली, कुर्णे, देवढे, हसोळ, शिरवली, अंजणारी, कुरचुंब आदी गावांमध्ये उन्हाळी व पावसाळी गवा रेडे कळपाने फिरत असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहेत. सध्या भातशेती प्रवसन अवस्थेत येत असल्याने गाव रेडे अन्नाच्या शोधार्थ भात शेतीत आढळून येत आहेत. येथील शेतकरी वर्ग गवा रेड्यांपासून शेतीचे नुकसान होऊ नये व त्यांना पळवून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर करत आहेत. शुक्रवारी तालुक्यातील शिरवली गावात पाच गवा रड्यांचा कळप दिसून आला. गेले अनेक दिवस या परिसरात गवारेड्यांचे वास्तव्य आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बाबत शिरावली गावचे पोलीस पाटील प्रसाद राजाकर यांनी लांजा वन विभागाला माहिती दिली आहे. वनरक्षक श्रावणी पवार यांनी शिरवली गावात भेट देऊन शेतीचे नुकसान होऊ नये यासाठी फटाके वाजवून गावा रेड्यांना पिटाळून लावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 02-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow