चिपळुणात ऑनलाइन शॉपिंग विरोधात ठरवणार धोरण

Sep 10, 2024 - 15:40
Sep 10, 2024 - 15:43
 0
चिपळुणात ऑनलाइन शॉपिंग विरोधात ठरवणार धोरण

चिपळूण : ऑनलाइन शॉपिंगमुळे चिपळूण बाजारपेठेचे ४० टक्के नुकसान झाले आहे. ऑनलाइन शॉपिंगचा बाजार असाच चालू राहिला तर पुढील दहा वर्षानंतर किरकोळ व्यापारी राहतील की नाही याबाबत शंका आहे. गणेशोत्सवानंतर व्यापान्यांचा चिपळूण शहारात  मेळावा होणार आहे. त्यात ऑनलाइन शॉपिंग विरोधातील धोरण ठरवले जाणार आहे, अशी माहिती व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष शिरीष काटकर यांनी दिली.

चिपळूणच्या व्यापारी संघटनेत फूट पडल्यानंतर संघटनेचे माजी अध्यक्ष काटकर यांच्या नेतृत्वाखाली गणेशोत्सवानंतर व्यापाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात प्रामुख्याने ऑनलाइन शॉपिंगच्या विरोधातील धोरण ठरवले जाणार आहे. याबाबत माहिती देताना काटकर महणाले, 'यावर्षी बाजारपेठेत गर्दी  होती; परंतु बहुतांशी नागरिकांनी ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले, त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीचा व्यापान्यांना म्हणावा तसा फायदा झाला नाही. ऑनलाइन व्यापार करणाऱ्या कंपन्यांमध्ये पूर्वी सरकारचा ५१ टक्के आणि या कंपन्यांचा ४९ टक्के हिस्सा होता. आता ऑनलाइन शॉपिंगमध्ये सरकारची भागीदारी पूर्णपणे संपली आहे. ब्रेडेड कंपन्या किरकोळ व्यापारांना चांगला नफा देण्यास तयार नाही. जीएसटी, इन्कम टॅक्स, कामगारांचा पगार, वीजबिल, स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर आणि इतर किरकोळ खर्च स्थानिक व्यापारांना भागवाये लागते. ऑनलाइन शॉपिंग करताना कंपनी देईल तो वस्तू ग्राहकांना स्वीकारावी लागते. स्थानिक बाजारपेठेत खरेदी करताना मात्र ग्राहक आवडीनुसार वस्तू निवडतात. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ऑनलाइन शॉपिंगच्या विरोधात केंद्रात आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही चिपळूममधील व्यापारी स्थानिक पातळीवर आवाज उठवणार आहोत. 

चिपळू‌णमधील स्थानिक व्यापाऱ्यांना स्थानिक पातळीवर अनेक समस्या भेडस्तवत आहेत. यातील काही समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत, व्यापाऱ्यांना कोणताही जातधर्म नसतो. व्यापारी ही एकत्व जात आहे, असे समजून जे लोक काम करतात अशा समविचारी लोकांना बरोबर घेऊन त्यांच्यासाठी सरकारकडे लढण्याचा मानस आहे. त्यासाठी गणपतीनंतर व्यापारांचा मेळावा घेण्यात येत आहे.

गणेशोत्सवापूर्वी चिपळूणमधील व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात व्यापाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा झाली सर्वपक्षीय व्यापाऱ्यांना आणि सर्व जातीधर्मातील व्यापाऱ्यांना एकत्र करून व्यापारीहिताचे धोरण राबवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शिरीष काटकर, माजी अध्यक्ष, व्यापारी संघटना चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:09 PM 9/10/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow