रत्नागिरी : रश्मी डांगे, सोनाली कातकरांचा पंतप्रधानांशी संवाद

Aug 27, 2024 - 12:43
 0
रत्नागिरी : रश्मी डांगे, सोनाली कातकरांचा पंतप्रधानांशी संवाद

रत्नागिरी : केरळाया धर्तीवर गुहागर कासे येथे नौका पर्यटनातून गेली ३ वर्षे एक ते दीड लाख उत्पन्न मिळवत असल्याचे रश्मी डांगे यांनी सांगताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रभावित होऊन शाबासकीची थाप दिली, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जळगाव येथे आयोजित लखपती दीदी संमेलनात रश्मी आणि सोनाली कातकर यांनी संवाद साधला.

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्रती अभियानांतर्गत (उमेद) रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजारपेक्षा नास्त स्वयंसाहायता समूहांची बांधणी करण्यात आती आहे. त्यात १ लाख ७९ हजार महिला संघटित करण्यात यश आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लखपती दीदी योजना सुरू झाली आहे जळगाव येथे २५ ऑगस्टला राज्य शासनाच्या माध्यमातून लखपती दीदी संमेलन झाले त्यात प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरातील ६२ महिलांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. जिल्ह्यातील वेलदूर (ता. गुहागर) रश्मी डांगे आणि कासे (ता. संगमेश्वर) येथील कातकर यांचा समावेश होता.

१२ महिलांचा सहभाग
जळगाव येथील कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून रश्मी रवींद्र डांगे (गुहागर), सोनाली संतोष कातकर (संगमेश्वर), नूतन नितीन शिंदे (चिपळूण), प्रीती यतिराज होडे (चिपळूण), शबनम दिलावर खडपोलकर (चिपळूण), वैशाली मंगेश चिले (चिपळूण), अंजली अनंत कडू (राजापूर), दीक्षा दीपक चव्हाण (राजापूर), प्रज्ञा प्रकाश पवार (लांजा), अपर्णा अविनाश जालगावकर (दापोली), रेश्मा रमेश जालगावकर (दापोली), नीता नामदेव पालकर (दापोली) या महिता आणि जिल्हा व्यवस्थापक विपणन अमोल काटकर व प्रभाग समन्वयक दापोली माधवी चव्हाण उपस्थित होते.

महिलांमध्ये असणाऱ्या अंगभूत क्षमतांचा व कौशल्याचा वापर करून रत्नागिरी जिल्हातीत पर्यटन संधी लक्षात घेता समूह, ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्या साठी विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प करण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ५४ ह‌जार महिलांचे उत्पन्न १ लाखापर्यंत वाढवून त्यांना या वर्षी लखपती दीदी करण्यात येईल. कीर्तीकिरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. ही संधी केवळ उमेद मुळेच मिळाली, त्यामुळे मी खूप रश्मी डांगे, वेलदर आनंदी आहे.

जळगाव येथे झालेल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात माझ्यासारख्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलेला संधी मिळाली. हा योग उमेदच्या माध्यमातून आम्हात्ता मिळाला आहे.- सोनाली कातकर, कासे

*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
01:06 PM 27/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow