ईद-ए-मिलाद निमित्त रत्नागिरीत भव्य रॅलीचं आयोजन

Sep 11, 2024 - 11:22
 0
ईद-ए-मिलाद निमित्त रत्नागिरीत भव्य रॅलीचं आयोजन

रत्नागिरी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस दरवर्षी ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस इस्लामिक कालगणना मधील तिसरा महिना रब्बीउल अव्वलच्या 12 तारखेला साजरा केला जातो.

मिलादुन्नबी इस्लामिक विश्वातला पवित्र दिवस मानला जातो. ईद-ए-मिलाद चे औचित्य साधून रत्नागिरी शहरात दिनांक 16 सप्टेंबर रोजी ठीक सकाळी साडेआठ वाजता रॅली चे आयोजन करण्यात आले आहे, सदर (जुलूस) कोकण नगर येथून निघेल, सदर रॅलीचा मार्ग कोकण नगर, मारुती मंदिर, उद्यम नगर ते कोकण नगर येथे शेवट होईल तसेच 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ठीक 07:00 वाजता वाजता लहान मुलांच्या रॅलीचे सुद्धा आयोजन कोकण नगर येथे करण्यात आले आहे आणि 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:00 वाजता ईद-ए-मिलाद च्या भव्य मैफिल चे आयोजन कोकण नगर फैजाने अत्तार येथे करण्यात आले आहे. तसेच कोकण नगर येथून ठीक सकाळी 8:30 वाजता रॅलीला सुरुवात होईल. तसेच ईद-ए-मिलाद चे औचित्य साधुन विशेष मुस्लिम महिलांसाठी उद्यम नगर मेमन समाज हॉल येथे 16 सप्टेंबर रोजी दुपारी 03:00 वाजता भव्य इज्तिमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिलांनी इज्तिमा मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow