रत्नागिरी : शिक्षक भरतीत स्थानिकांना संधी न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

Sep 11, 2024 - 11:14
Sep 11, 2024 - 11:25
 0
रत्नागिरी : शिक्षक भरतीत स्थानिकांना संधी न दिल्यास आंदोलन छेडण्याचा  इशारा

लांजा : महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाया व प्राथमिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची शिक्षक पात्रता (टीईटी) चाचणी १० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्यासाठी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत कालावधी राज्य शिक्षण प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या परीक्षेला महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यातून या परीक्षा होणार आहेत.

त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवारांव्यतिरिचत अन्य जिल्ह्यातील उमेदवारांना परीक्षेला रत्नागिरीत  संधी देऊ नये, यासह उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना जिल्ह्यातच शिक्षक म्हणून नेमणुका कराव्यात; अन्यथा शिक्षण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डीएड, बीएड बेरोजगार जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता
चाचणी अर्थातच महाटीईटीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली. उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आखले आहेत. त्यामुळे शिक्षकाची सेवा करण्याची वाट पाहत असलेल्या डीएड, बीएड उमेदवारांना टीईटी या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. शिक्षक पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यात व विविध संकेतस्थळांबर झुंबड सोमवारपासून
सुरू झाली आहे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवल्या आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण व शिक्षक परिषद यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे.

त्यांच्या सूचनेद्वारे पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांसाठी आता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रताः निश्चित केली आहे. त्यालाच शिक्षक पात्रता (टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट) म्हणजेच टीईटी असे म्हटले जाते.

ज्यांना प्राथमिक शिक्षक व्हायचे आहे त्यांना टीईटी परीक्षा सकतीचे करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून होणार आहे. डीएड, बीएड बेरोजगारांना शिक्षण विभागाने नवसंजीवनी देऊन शिक्षक होण्याची स्वप्न पाहणाऱ्याना संधी मिळाली आहे.  त्यामुळे शिक्षक

डीएड, बीएड बेरोजगारांना शिक्षण विभागाने नवसंजीवनी देऊन शिक्षक होण्याची स्वप्न पाहणान्यांना संधी मिळाली ज्वहे. त्यामुळे शिक्षक सेवा करण्यास उत्सुक असलेले उमेदवार आतापासूनच टीईटीच्या पूर्वतयारीला लागले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधून हजारो उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. महाराष्ट्रातील असे अनेक जिल्ह्यांतून हजारो उमेदवार परिक्षेला सामोरे जाणार असल्याने राज्य शिक्षण विभाग त्या दृष्टीने तयारीला लागले, आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातून हजारी उमेदवार टीईटी परीक्षेला असणार असल्याने उमेदवारांमध्ये आतापासून लगबग सुरू झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात डीएड, बीएड बेरोजगारांची मोठी संख्या आहे. मात्र काहींनी प्रयत्न करून निवड न झाल्याचे अन्य व्यवसायाकडे वळले. मात्र शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात डीएड, बीएड धारक पुन्हा टीईटी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow