लांजा पोलिस ठाण्यात गणरायाची प्रतिष्ठापना

Sep 11, 2024 - 11:24
 0
लांजा पोलिस ठाण्यात गणरायाची प्रतिष्ठापना

लांजा : लांजा पोलिस ठाण्यामार्फत येथील महापुरुष  मंदिरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदा उत्सवाचे ६५ वे वर्षे आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. 

गणेशोत्सवात गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गंभीर घटना घड़ नये यासाठी करावा लागणारा बंदोबस्त यामुळे पोलिसांना घरी गणेशोत्सवाला जाता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन लांजा पोलिस ठाणे येथे १९५९ मध्ये प्रथम चव्हाटा मंदिराच्या पाठीमागे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर गेली २९ वर्षे लांजा पोलिस ठाण्याच्या आवारातील महापुरुष मंदिरात बाप्पांची प्रतिष्ठापना केली जात आहे. नियमित कामाच्या व्यापातून थोडासा वेळ बाजूला काढून पोलिस ठाण्यातील प्रत्येक पोलिस कर्मचारी विघ्नहर्त्याच्या  सेवेत लीन होतो. या बाप्पांचे आगमन होण्याअगोदर मखर, आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामांमध्ये सर्व पोलिस कर्मचारी तन्मयतेने आणि भक्तीभावाने सहभागी होतात. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर दररोज सकाळी-संध्याकाळी होणारी पूजाअर्चा, आरती यातही प्रत्येक पोलिस कर्मचारी सहभागी होतो. यंदा तालुक्यातील भडे येथील मूर्तिकार दीपक भडेकर यांनी बाप्पाची मूर्ती साकारली आहे. पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 9/11/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow