गुहागरमध्ये रेवस-रेडी सागरी महामार्गासाठी मोजणी सुरू

Aug 10, 2024 - 12:07
 0
गुहागरमध्ये रेवस-रेडी सागरी महामार्गासाठी मोजणी सुरू

गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ व तवसाळ खुर्द या दोन ठिकाणी रेक्स रेडी सागरी महामार्गासाठीची दाभीळ व जयगड खाडीवरील पुलासाठी येथील गावात आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपदानासाठीची मोजणी सुरू झाली आहे. बुधवार व गुरुवारी या दोन ठिकाणी मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

रेवसर-रेडी सागरी महामार्गासाठीची तयारीही शासनातर्फे जोरदारपणे सुरू झाली आहे. दापोली व गुहागरला जोडण्यासाठी दाभोळ खाडीवरील पूल सर्वात मोठा समजला जाणार आहे. तर दुसरीकडे गुहागर व रत्नागिरी तालुक्याला जोडण्यासाठी जयगड खाडीवरील पूलही तितकाच महत्त्वाचा आहे. यामुळे येत्या काळात दळणवळणाच्या सुविधेला अधिक प्रमाणात गती मिळणार आहे.

रायगडमधील रेवस तसेच सिंधुदुर्गातील रेडीदरम्यान होणाऱ्या या सागरी महामार्गासाठी जयगड खाडीवरील पुलासाठी प्रथम गुहागर तालुक्यातील तत्वसाळ व तवसाळ खुर्द या गावातील भूसंपादानासाठीची मोजणी गेले दोन दिवस सुरू आहे. येथील ग्रामस्थांनीही या मोजणीला सहकार्य केले आहे, तर दुसरीकडे दाभोळ खाडीवरील पुलाकारिता वेलदूर व घाटवाडीतर्फे वेलदूर या गावातील आवश्यक जागेची मोजणी जाहीर करण्यात आली आहे.

आतापर्यंत या सागरी महामार्गासाठी केवळ या चार गावातीलच मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुहागर शहरातील बदलत्या मार्गाकडे सर्वांचे लक्ष सागरी महामार्ग गुहागर शहरातून जाताना अनेक अडचणी आहेत. अशावेळी सदरचा मार्ग हा रेस्ट हाऊसच्यावरील बाजूने न्यावा, अशी मागणी शहरवासीयांतर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:34 PM 10/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow