भाजपाच्या प्रचार समितीत कामाला किरीट सोमय्यांचा नकार

Sep 11, 2024 - 10:25
Sep 11, 2024 - 11:26
 0
भाजपाच्या प्रचार समितीत कामाला किरीट सोमय्यांचा नकार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रदेश भाजपने किरीट सोमय्या यांच्यावर निवडणूक आयोगाशी संपर्काची जबाबदारी सोपवली आहे. तथापि, मला सामान्य सदस्य म्हणून काम करायला आवडेल, असे सांगत सोमय्या यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. मी गेली साडेपाच वर्षे भाजपचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. मला सामान्य सदस्य म्हणून काम करू द्यावे, असे त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राकडे घरचा आहेर म्हणून पाहिले जात आहे.


 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow