देवरुखात इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा

Sep 11, 2024 - 11:27
 0
देवरुखात इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा

देवरुख : शहरातील नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ५ व स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत नगर पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पर्यावरणपुरक गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा कालावधी ७ ते १७ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. गणेशमूर्ती ही संपूर्ण पर्यावरणपूरक असणे त्याचबरोबर गणेशमूर्ती सजावट ही संपूर्ण नैसर्गिक व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करुन केलेली असणे आवश्यक आहे. सजावटीकरिता पर्यावरण संवर्धन, स्वच्छते बाबतचे, टाकाऊ वस्तुंचा पुनर्वापर व सामाजिक संदेश इ. विषयांचा आधार घेतल्यास अशा सजावटीला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक, देवरुख नगरपंचायत यांनी दिली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नागरिकांना नगरपंचायत कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज विनामूल्य मिळणार असून, १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरीकांनी नगरपंचायत कार्यालयात अर्ज जमा करावयाचे आहेत. स्पर्धेचा निकाल १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार असून, प्रथम क्रमांकास रु. ३ हजार ३३३, द्वितीय क्रमांकास रु. २ हजार, २२२, तृतीय क्रमांकास रु. १ हजार १११, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन चेतन विसपुते, मुख्याधिकारी देवरुख नगरपंचायत यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow