खेड : जगबुडी पुलावरून दुचाकी कोसळली

Sep 11, 2024 - 11:36
 0
खेड : जगबुडी पुलावरून दुचाकी कोसळली

खेड : तालुक्यातील भरणरनजीक मंगळवार दि. १० रोजी सकाळी ९.३० वाजता मुंबई-गोवा महामार्गावरून जाणारी दुचाकी जगबुडी नदी पुलावर घसरली. त्यामुळे त्यावरील दोन स्वार पुलावर कोसळले तर त्यांची दुचाकी नदीपात्रात कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आहेत. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून गोव्याच्या दिशेने दि.१० रोजी सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले; परंतु त्यांची दुचाकी रस्त्यावरून कठडा ओलांडून थेट नदीपात्रात पडली. दोन्ही दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow