रत्नागिरी : ओम साई मित्रमंडळाने साकारला गो माता संवर्धनाचा देखावा
रत्नागिरी : गो मातेचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू आहे. देशी गो वंशाचे संवर्धन, संरक्षण केले पाहिजे, असा या संदेश देणारा देखावा साळवी स्टॉप येथील ओम साई मित्रमंडळाने साकारला आहे. गो माता व वासरे यांचा देखावा बनवला असून मध्यभागी गणेशबाप्पा जी विराजमान झाले आहेत. या मंडळाचे यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे तिसावे वी वर्ष आहे.
रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी मोकाट गुरे फिरताना दिसतात. गावांमध्ये मनुष्यबळाअभावी गाई-गुरे पाळणाऱ्यांची संख्यादेखील कमी झाली आहे; परंतु गो वंशाचे संगोपन, संवर्धन होण्याची आवश्यकता आहे.
गोमातेचे रक्षण करा, असा देखावा या मित्रमंडळाने साकारला आहे. शुक्रवारी (ता. १३) श्रीरंग निर्मित हीच तर प्रेमाची गंमत आहे, १४ सप्टेंबरला सकाळी ८ वा. गणेशयाग, रात्री ९ वा. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालय संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. १५) रांगोळी व पाककला स्पर्धा, रात्री ९ वा. स्वराशिष ऑर्केस्ट्राचे आयोजन केले आहे. १६ ला सत्यनारायण महापूजा, खिचडी प्रसाद, रात्री ९.३० वा. स्थानिक मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम, जादूगार विनयराज व त्यांचे चित्तथरारक जादूप्रयोग दाखवण्यात येणार आहेत. १७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वा. साळवी स्टॉप येथून मांडवीपर्यंत विसर्जन येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 9/11/2024
What's Your Reaction?