लांजातील डम्पिंग ग्राउंडसंदर्भात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी निरुत्तर

Aug 16, 2024 - 10:02
Aug 16, 2024 - 11:38
 0
लांजातील डम्पिंग ग्राउंडसंदर्भात नगराध्यक्ष, मुख्याधिकारी निरुत्तर

लांजा : ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी व अन्य अधिकारी यांना उत्तर न देता आल्याने कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राउंडसंदर्भात नगरपंचायत सभागृहात आयोजित केलेली बैठक हो निष्पळ ठरली. ग्रामस्थांनी मुद्देसूद व आक्रमकपणे आपली भूमिका मांडली. त्यामुळे उत्तरे देताना प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्रशासनाला उत्तर देता येत नसेल तर १५ ऑगस्टला आम्ही उपोषण करणारच. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपंचायतवर राहील, असा इशारा कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंडसंदर्भात तहसीलदारांशी झालेल्या चर्चेमध्ये तहसीलदारांनी ग्रामस्थांच्या संदर्भात सविस्तर चर्चा करा, तसेच मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता करा, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार लांजा नगरपंचायत सभागृहात सायंकाळी बैठक आयोजित केलो होती. या बैठकीत जबरदस्तीने लादण्यात येणाऱ्या डम्पिंग ग्राउंडसंदर्भात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थ मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर यांनी ग्रामस्थांनी मुंबई उच्य न्यायालयात दावा दाखल केलेला असताना भूसंपादन करता येते का? तसा अधिकार नगरपंचायतीला आहे का ? यांसह हा प्रकल्प राबवताना नगराध्यक्ष आणि नगर पंचायतीची जबाबदारी काय होती ? या प्रकल्पासंदर्भात ग्रामस्थांना विश्वासात का घेण्यात आले नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती केली. आज चार वर्षानंतरच ग्रामस्थांशी चर्चा करण्याचे नगर पंचायतीला उपरती कशी झाली? म्हणजेच ग्रामस्थांवर हा प्रकल्प जबरदस्तीने लादण्याचा जमीन खरेदी केली, डम्पिंगसाठी भूसंपादन केले जात असेल तर त्याची प्रत आम्हाला द्या, अशी मागणी केल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाकडून सन २०१७ चा जीआर ग्रामस्थांना देण्यात आला. २०२१ ला ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला असताना २०१७ चा जीआर देऊन ग्रामस्थांची फसवणूक केली जात असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे निवड समितीने कोत्रेवाडी येथील जागा प्रकल्पासाठी घ्यावी, असे जे पत्र प्रशासनाकडे आहे त्याची ग्रामस्थांनी मागणी केली. ते सध्या आपल्याकडे नाही. जिल्हाधिकारी कार्याकडून ते मागवून दिले जाईल, असे उत्तर ग्रामस्थांना दिल्यानंतर ग्रामस्थांनी Reply पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला.

कोणा एका व्यक्तीसाठी
यापूर्वी जिल्हा निवड समितीने नाकारलेल्या कोत्रेवाडी येथील प्रस्ताव पुन्हा स्वीकारताना त्याच ठिकाणी डंपिंग ग्राउंड राबवण्यासाठी लांजा नगरपंचायत आग्रही राहते, यावरूनच यात काय काय व कोणते प्रकार झाले आहेत हे समजते. कोणा एका व्यक्तीसाठी नगरपंचायत प्रशासन पायघड्या घालते तर उर्वरित ग्रामस्थांशी चर्चा करण्याचे टाळते यावरून सर्व काही स्पष्ट होते, असे ग्रामस्थांनी सुनावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 16/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow