गुहागर एसटी आगारातील पथदीपांची दुरुस्ती

Jun 5, 2024 - 16:46
Jun 5, 2024 - 17:24
 0
गुहागर एसटी आगारातील पथदीपांची दुरुस्ती

गुहागर : गुहागरचे एसटी आगारातील पथदीप दुरुस्त करण्यात आले असून आगार प्रकाशमान झाले आहे. मात्र, वर आलेलों खड़ी आजही धोकादायक ठरत असून कॉक्रिटीकरणाला अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही.


गुहागर आगारातील कार्यशाळा व प्रशासकीय कामकाजाठिकाणी हायमास्टसहित लख्ख प्रकाश पडलेला दिसून येत होता. ज्या प्रवाशाच्या भरवश्यावर एसटी चालते त्याच प्रवाशाला मात्र अंधारात बाचपडत एसटी सेवा घ्यावी लागत आहे. याबाबत वृत्ताची दखल आगारप्रमुख व विभागीय पातळीवरून घेण्यात आली आहे. त्यानंतर तातडीने दिवे दुरुस्त करण्यात आले आहेत. पार्किंगच्या ठिकाणी नादुरुस्त ट्यूबही बसवण्यात आल्या दिसून येत आहे.

अजूनही आगारातील खड्डे पाहलेले व खाडी वर आलेली स्थिती कायम असून येथील कॉक्रिटीकरणाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, डिसेंबर २०२३ ला येथील काँक्रिटीकरणाचे काम अलोरे येथील आशिष मुहारेकर यांना देण्यात आले आहे. प्रलंबित कामाची बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवसांतच कामाला सुरुवात करतो, असे येथील आगारप्रमुख सोनाली कांबळे यांना सांगितले होते; परंतु अद्याप काम सुरू केलेले नाही, यामुळे ठेकेदाराने एसटी महामंडाळाच्या अधिका-यांची टोलवाटोलवी सुरू ठेवली आहे. याबाबत कांबळे यांनी पथदीप दुरुस्ती ही संबंधित ठेकेदाराकडून करवून घेतली आहेत; मात्र काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराने आज येती उद्या येतो, असे माषत अजूनही काम प्रलंबित ठेवले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:13 PM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow