खेड : घरफोडी करून दोन लाखांचे दागिने चोरट्याने लांबवले

Sep 12, 2024 - 11:30
Sep 12, 2024 - 14:32
 0
खेड : घरफोडी करून दोन लाखांचे दागिने चोरट्याने लांबवले

खेड : शहरात ऐन गणेशोत्सवातच बंद असलेले घर फोडून कपाटातील २ लाख १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यावर येथील पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून शहरात वास्तव्यास गणरायाच्या असलेले काहीजण गणेशोत्सवासाठी आपआपल्या गावी गेले आहेत.

दादा महादेव देवरुखकर हे घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून पत्नी व मुलांसह बाहेर गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने बंद घरातील सोन्याचे दागिने लांबवले. चोरट्यावर गुन्हा, धारदार हत्याराने कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले २ तोळे ८५० ग्रॅम वजनाचे व २ लाख १८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:55 PM 9/12/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow