रत्नागिरी : 'झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा' असा संदेश देत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Jun 21, 2024 - 16:05
 0
रत्नागिरी : 'झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा' असा संदेश देत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : 'झाडे लावा, झाडे जगवा, पृथ्वी वाचवा' असा संदेश देत प्रभाग क्र. २ माळनाका बोर्डिंग रोड येथील आरंभ प्रतिष्ठान व महिला मंडळ यांचे सर्व पदाधिकारी तसेच माजी नगरसेविका सौ. स्मितल पावसकर या सर्वांच्या सहकार्याने प्रभागामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. 

गेली ५ वर्ष सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचीझाडे प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येतात. यावर्षी जांभूळ, अडुळसा, निव, आवळा, कडुलिंब, निगडी,  करंज, वड, पिंपळ, शमी, बेल औषधी वनस्पती बरोबर विविध फुलझाडे ही लावण्यात आली. तसेच यावर्षी मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वयंवर हॉल समोर सर्कल मध्ये येथील महिलांनी वडाचे झाड लावून एकत्रितपणे आज वटपौर्णिमेची पूजा केली. तसेच विविध झाडेही लावली. ही झाडे वाढवण्याचा जगवण्याचा संकल्प करण्यात आला.
 
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:31 21-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow