चिपळूण एसटी आगारातर्फे श्रावणी सोमवारी मार्लेश्वर दर्शन यात्रेचे आयोजन

Aug 1, 2024 - 14:12
 0
चिपळूण एसटी आगारातर्फे श्रावणी सोमवारी मार्लेश्वर दर्शन  यात्रेचे आयोजन

चिपळूण : चिपळूण एसटी आगारातर्फे श्रावण मासानिमित्त प्रत्येक सोमवारी मार्लेश्वर दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी ८ वा. ही बस चिपळूण आगारातून सुटेल आणि दुपारी ३:३० वा. मार्लेश्वरहून ही बस चिपळूणकडे यायला निघेल. या एसटी बससाठी आगाऊ बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तिकीट दर १३० रुपये असून, महिलांसाठी ५० टक्के, तर ७५ वर्षे पूर्ण असणाऱ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन चिपळूण एसटी आगारातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 01/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow